मर्जी तुमची
मी सांभाळीन,
हृदयी द्या
आसरा
सख्या हो, आज
मला सावरा !
स्वप्नांचा
हा मंचक सजला
धुंद सुगंधी
होऊन भिजला
राहू कशी मी
दूर साजणा
जवळी घ्या ना
जरा
सख्या हो, आज
मला सावरा !
हळू जरासा घाला
विळखा
जीव होऊ दे
हलका हलका
गोड गुलाबी
उठता काटा
मोहरले दिलवरा
सख्या हो, आज
मला सावरा !
चालू कशी मी
बोलू कशी
मनातले मन खोलू
कशी
मुकी असूनही
गाते गाणे
माझ्या गुलमोहरा
सख्या हो, आज
मला सावरा !
|