विठूमाऊली तू, माउली जगाची
माउलीत मूर्ती विठ्ठलाची
विठ्ठला, मायबापा

काय तुझी माया सांगु शिरीरंगा
संसाराचि पंढरी तू, केली पांडुरंगा
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा
विठ्ठला, मायबापा
अभंगाला जोड टाळ-चिपळ्यांची
माउलीत मूर्ती विठ्ठलाची
विठ्ठला, मायबापा

लेकरांची सेवा केलीस तू आई
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला, पांडुरंगा
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची
माउलीत मूर्ती विठ्ठलाची
विठ्ठला, मायबापा
 
 
गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - अनिल-अरुण
स्वर - सुरेश वाडकर, सुधीर फडके, जयवंत कुलकर्णी
चित्रपट - अरे संसार संसार (१९८१)
For the printable version of this song, click here.