नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा
सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा

शब्दरूप शक्ती दे
भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा

विद्याधन दे अम्हास
एक छंद, एक ध्यास
नाव नेइ पैलतिरी, दयासागरा

हो‍उ आम्हि नीतिमंत
कलागुणी बुद्धिमंत
किर्तीचा कळस जाय उंच अंबरा
 
 
गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - राम कदम
स्वर - उत्तरा केळकर
चित्रपट - सुशीला (१९७८)
राग - केदार (नादवेध)
For the printable version of this song, click here.