संसार-मंदिरी
या, आता उणे
न काही
आनंद नाचतो
ग, आनंद गीत
गाई
झाले सुवासिनी
मी, हातात राज्य
आले
गृहिणीपदावरी
मी, साऱ्या
सुखात न्हाले
ही ठेव वैभवाची,
नांदे दिशात
दाही
या श्याम मंजिरीचा,
वृंदावनी पिसारा
दारात कर्दळीला,
झुलवी सुगंध
वारा
हे झाड अंगणी
या, रखवालदार
राही
पतिरूप देवा
माझा, सिंहासनी
विराजे
गालात हासते
मी, डोळ्यांत
प्रीत लाजे
भाग्यास आज
माझ्या उपमा
सुचे न काही
|