सांगा मुकुंद कुणि हा पाहिला
सांगा मुकुंद कुणि हा पाहिला

रासक्रीडा करिता वनमाळी हो,
सखे होतो आम्ही विषयविचारी
टाकुनि गेला तो गिरिधारी
कुठे गुंतून बाई हा राहिला
सांगा मुकुंद कुणि हा पाहिला

गोपी आळविती, हे ब्रजभूषणा हे
वियोग आम्हालागी तुझा ना साहे
भावबळे वनिता व्रजाच्या हो
बोलावुनि सुताप्रती नंदाजीच्या
प्रेमपदी यदुकुळटिळकाच्या
म्हणे होनाजी, देह हा वाहिला
सांगा मुकुंद कुणि हा पाहिला
 
 
गीत - शाहिर होनाजी बाळा
संगीत - वसंत देसाई
स्वर - आशा भोसले, पंडितराव नगरकर
चित्रपट - अमर भूपाळी (१९५१)
For the printable version of this song, click here.