हाऊस ऑफ बॅम्बू !
नंबर फिफ्टी फोर, द हाऊस विथ द बॅम्बू डोर !
बांबूचे घर, बांबूचे दार, बांबूची जमिन पिवळीशार !
हाऊस ऑफ बॅम्बू !
बांबूच्या वनात, वाऱ्याचा सूर
जिवाला नेतो भुलवूनी दूर !
हाऊस ऑफ बॅम्बू !
बांबूच्या वनात झऱ्याच्या काठी
येशील सजणे माझ्याच पाठी !
हाऊस ऑफ बॅम्बू !
बांबूच्या घरात स्वप्नांचा झूला
झुलवित राहिल, तुला नि मला !
हाऊस ऑफ बॅम्बू !
बांबूचे घर पहायला हवे
बांबूच्या घरात राहायला हवे !
हाऊस ऑफ बॅम्बू !
रूपाचा उजेड डोळ्यांचा दिवा
बांबूच्या घरात तेवायला हवा !
हाऊस ऑफ बॅम्बू !
गीत
-
शांता शेळके
संगीत
-
सी. रामचंद्र
स्वर
-
प्रमिला दातार,
मन्ना डे
चित्रपट
-
घरकुल (१९७०)