म्यानातुनि
उसळे तलवारीची
पात
वेडात मराठे
वीर दौडले सात
!
ते फिरता बाजूस
डोळे किंचित
ओले
सरदार सहा सरसावुनि
उठले शेले
रिकिबीत टाकले
पाय, झेलले
भाले
उसळले धुळीचे
मेघ सात, निमिषात
वेडात मराठे
वीर दौडले सात
!
आश्चर्यमुग्ध
टाकून मागुती
सेना
अपमान बुजविण्या
सात अर्पुनी
माना
छावणीत शिरले
थेट, भेट गनिमांना
कोसळल्या उल्का
जळत सात दर्यात
वेडात मराठे
वीर दौडले सात
!
खालून आग, वर
आग, आग बाजूंनी,
समशेर उसळली
सहस्त्र क्रुर
इमानी,
गर्दीत लोपले
सात जीव ते
मानी
खग सात जळाले
अभिमानी वणव्यात
वेडात मराठे
वीर दौडले सात
!
दगडांवर दिसतिल
अजुनि तेथल्या
टाचा
ओढ्यात तरंगे
अजुनि रंग रक्ताचा
क्षितिजावर
उठतो अजुनि
मेघ मातीचा
अद्याप विराणी
कुणि वाऱ्यावर
गात
वेडात मराठे
वीर दौडले सात
!
|