राणी तुझ्या
नजरेने नजरबंदी
केली ग
ती जादू मनी
प्रीतीला फुलवून
गेली ग !
हसले तुझ्या
नयनात कसे धुंद
चांदणे
मदनाने ही किमया
तुला दान केली
ग !
झुरतात नभी
तारका मुखचंद्र
पाहुनी
रूपात तुझिया
चंचल झलक रंगलेली
ग !
खोट्या रुसव्यात
तुझ्या, होकार
खुषीचा नटला
माझ्यावरी इष्काने
मेहेरबानी केली
ग !
|