असा बेभान हा
वारा, कुठे
ही नाव मी नेऊ
?
नदीला पूर आलेला,
कशी येऊ, कशी
येऊ ?
जटा पिंजून
या लाटा विखारी
झेप ही घेती
भिडे काळोख
प्राणांना,
दिशांचे भोवरे
होती
जिवाचे पूल
हे माझ्या तुझ्या
पायी कशी ठेवू
?
कुळाचे, लौकीकाचे
मी क्षणी हे
तोडिले धागे
बुडले गाव ते
आता, बुडले
नावही मागे
दिले, हे दान
दैवाने करी
माझ्या कशी
घेऊ ?
जगाच्या क्रूर
शापांचे जिव्हारी
झेलले भाले
तुझे सौभाग्य
ल्याया, हे
तुझी होऊन मी
आले
तुझे तू घे
उरी आता, किती
मी हाक ही देऊ
?
|