रुपे सुंदर
सावळा गे माये
वेणु वाजवी
वृंदावना गोधने
चारिता ॥१॥
रुणझुण वाजवी
वेणु
वेधी वेधले
आमुचे तनमनु
ओ माये ॥२॥
गोधने चारी
हती घेऊन काठी
वैकुंठीचा सुकुमार
गोपवेषे जगजेठी
वैकुंठीचा सुकुमार
गोधने चारीताहे
॥३॥
एका जनार्दनी
भुलवी गौळणी
करीती तनुमनाची
वोवाळणी वो
माये ॥४॥
|