तुला पाहिले
मी नदीच्या
किनारी
तुझे केस पाठीवरी
मोकळे
इथे दाट छायांतुनी
रंग गळतात
या वृक्षमाळेतले
सावळे !
तुझी पावले
गे धुक्याच्या
महालात
ना वाजली ना
कधी नादली
निळागर्द भासे
नभाचा किनारा
न माझी मला
अन् तुला सावली
.....
मनावेगळी लाट
व्यापे मनाला
जसा डोंगरी
चंद्र हा मावळे
पुढे का उभी
तू तुझे दुःख
झरते ?
जसे संचिताचे
ऋतु कोवळे .....
अशी ओल जाता
तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या
उरी केवढा
तमातूनही मंद
ता-याप्रमाणे
दिसे की तुझ्या
बिल्वरांचा
चुडा .....
|