जपून चाल्‌ पोरी जपून चाल्‌
बघणा-या माणसाच्या जिवाचे हाल्‌ !

लाडाने वळून बघायची खोड्‌
नाजूक नख-याला नाही या तोड्‌
डोळ्यांत काजळ, गुलाबी गाल्‌ !

केसात सुरंगी रंगात ग
विजेची लवलव अंगात ग
खट्याळ पदराला आवर घाल्‌ !

जिंकीत जिंकीत जातेस तू
ज्वानीचं गाणं हे गातेस तू
हासून होतेस लाजून लाल्‌ !

उरात लागलेत नाचाया मोर्‌
कोणाच्या गळ्याला लागेल दोर्‌ ?
माझ्या या काळजाचा चुकेल ताल्‌ !
 
 
गीत - मंगेश पाडगावकर
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - अरुण दाते
For the printable version of this song, click here.   
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.