रुपे श्यामसुंदर निलोत्पल गाभा
सखीये स्वप्नी शोभा देखियेला
शंखचक्र गदा शोभती चहुकरी
सखीये गरुडावरी देखियेला
पितांबर कटी दिव्य चंदन उटी
सखीये जगजेठी देखियेला
विचारता मानसी नये जो व्यक्तीसी
नामा केशवेसी लुब्धोनी गेला
रचना
-
संत नामदेव
संगीत
-
प्रभाकर पंडित
स्वर
-
सुरेश वाडकर