हे सावळ्या घना
का छेडिसी मनाच्या अशा, तारा पुन्हा पुन्हा

पानातुनी या मोहुनी गाणे जलाचे फुले
गाण्यांतुनी त्या दाटुनी झेले फुलांचे हासले
वारा हळू हा प्रीती-स्वरांनी झुलवी तृणातृणा

थेंबापरी या नाचवी, पक्षी स्मृतींचा तुरा
त्या आठवांनी भारले माझ्या मनाच्या अंबरा
आता प्रियाची चाहूल ऐसी भुलवी कणाकणा
 
 
गीत - शांताराम नांदगावकर
संगीत - अनिल-अरुण
स्वर - अनुराधा पौडवाल
For the printable version of this song, click here.