दर्पणी बघते
मी गोपाळा
साज सुगंधी
करू कशाला ?
कोमल माझ्या
प्रतिबिंबातुन,
बिंब तयाचे
बघते न्याहळुन
नेत्र फुलांची
होता पखरण,
फुलवेणी ही
घालु कशाला
?
स्वैर अजाणु
पाठीवरती,
श्यामल कुरळे
कुंतल रुळती
सुंदरतेला मिळता
मुक्ती,
मोहबंधनी बांधु
कशाला ?
भरता चिंतन
नयनी अंजन
गोविंदाचे घडता
दर्शन
भक्तीचे हे
बांधुन पैंजण,
लोकरंजनी नाचु
कशाला
|