पुण्य पर‍उपकार पाप ते परपीडा ।
आणिक नाहीं जोडा दुजा यासी ॥१॥

सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म ।
आणिक हे वर्म नाही दुजे ॥२॥

गति तेचि मुखी नामाचें स्मरण ।
अधोगती जाण विन्मुखता ॥३॥

संतांचा संग तोचि स्वर्गवास ।
नर्क तो उदास अनर्गळ ॥४॥

तुका म्हणे उघडे आहे हित यांत
जया जें उचित करा तैसे ॥५॥
 
 
रचना - संत तुकाराम
संगीत - राम फाटक
स्वर - पं. भीमसेन जोशी
राग - तोडी (संगीत यात्रा)
For the printable version of this song, click here.