भातुकलीच्या
खेळामधली राजा
आणिक राणी
अर्ध्यावरती
डाव मोडला,
अधुरी एक कहाणी
राजा वदला,
"मला समजली,
शब्दावाचुन
भाषा
माझ्या नशिबासवे
बोलती तुझ्या
हातच्या रेषा"
का राणीच्या
डोळा तेव्हा
दाटुनि आले
पाणी ?
राणी वदली बघत
एकटक दूरदूरचा
तारा
"उद्या पहाटे
दुसऱ्या वाटा,
दुज्या गावचा
वारा"
पण राजाला उशिरा
कळली गूढ अटळ
ही वाणी
तिला विचारी
राजा, "का हे
जीव असे जोडावे
?
का दैवाने फुलण्याआधी,
फूल असे तोडावे
?"
या प्रश्नाला
उत्तर नव्हते,
राणी केविलवाणी
का राणीने मिटले
डोळे दूर दूर
जाताना ?
का राजाचा श्वास
कोंडला गीत
तिचे गाताना
?
वाऱ्यावरती
विरून गेली
एक उदास विराणी
|