राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।
रविशशिकळा लोपलिया ॥१॥

कस्तुरी मळवट चंदनाची उटी ।
रुळे माळ कंठी वैजयंती ॥२॥

मुकुट कुंडले श्रीमुख शोभले ।
सुखाचे ओतले सकळही ॥३॥

कासे सोनसळा पांघरे पांटोळा ।
घननीळ सांवळा बाइयांनो ॥४॥

सकळही तुम्ही व्हागे एकीसवा ।
तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥५॥
 
 
रचना - संत तुकाराम
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - पं. भीमसेन जोशी
राग - शिवरंजनी (नादवेध)
For the printable version of this song, click here.