रडू नको रे चिमण्या बाळा
हसण्यासाठी जन्म आपुला
फुले गोजिरी कधी न रडती
नभी पाखरे हासत उडती
पहा विचारुन आभाळाला
निळ्या अंगणी हसती तारे
हासत रिंगण धरिती वारे
सदैव हसतो चंद्र चिमुकला
सौख्यासाठी जग तळमळते
दुख कुणाला कधी न टळते
जो हसला तो अमृत प्याला
गीत
-
शांताराम आठवले
संगीत
-
सुधीर फडके
स्वर
-
मोहनतारा अजिंक्य
चित्रपट
-
वहिनीच्या बांगड्या (१९५८)