जय जय रमारमण श्रीरंग !

पदार्विंदी सदा रमावा
माझा मानस भृंग !

त्रिभुवन सुंदर रूप देखुनी
लज्जित होय अनंग !

संत जनांच्या कीर्तन रंगी
रंगनाथ होय दंग !

तो करुणाकर, तो कमलाकर
जलाधर श्यामल अंग !

भक्त चालकां मुदित करितसे
दुरित दैन्य भय भंग !
 
 
गीत - विद्याधर गोखले
संगीत - वसंत देसाई
स्वर - भालचंद्र पेंढारकर
नाटक - जय जय गौरीशंकर (१९६६)
For the printable version of this song, click here.