नयन तुझे जादुगार
हरिणीचा हरिति नूर
त्यात सुंदरी कशास
काजळ हे घालतेस ?

साधाही नयन-बाण
विंधतसे काळजास
मग त्याला का उगाच
काळकूट माखतेस ?
 
 
गीत - विद्याधर गोखले
संगीत - वसंत देसाई
स्वर - भालचंद्र पेंढारकर
नाटक - पंडितराज जगन्नाथ (१९६०)
For the printable version of this song, click here.