मदनाची मंजिरी, साजिरी, उषाच हसरी
चंद्रिका कोवळी, काय ही, नाजुक चाफेकळी ?

गुलाब या गाली, केतकी, कंतिमान भाली
रूप-यौवनाने, बहरली, बाग वसंतातली

रसिक मनोहारिणी, घटी या, रसिकचित्त भरुनी
कुरंग-नयना कुठे, आजला, गज-गमना चालली

उरोज कुंभापरी रम्य हा, कुंभ शोभतो शिरी
सुधा-कुंभ घेऊनी येई का, रंभा वसुधातली ?
 
 
गीत - विद्याधर गोखले
संगीत - वसंत देसाई
स्वर - भालचंद्र पेंढारकर
नाटक - पंडितराज जगन्नाथ (१९६०)
For the printable version of this song, click here.