मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी
ओठात घोळविन रामप्रीतिची गाणी

पुसतील कुशल मज लता, कर्दली, केळी
मोगरा, मालती फुलतिल भलत्या वेळी
देईल साद मज दुरुनि श्यामाराणी

देतील ओंजळी भरून जांभळी, बोरी
येतील पाडसे दबत हळू शेजारी
चुंबीन त्यास मी भरविन चारापाणी

पाहीन दुरुन मी यज्ञधुमाची रेखा
जाईन तपोवनि अवचित कोण्या एका
तरुतळी बसुनिया ऐकिन मुनीची वाणी
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - वासुदेव भाटकर
स्वर - ज्योत्सना भोळे
नाटक - भूमिकन्या सीता (१९५८)
For the printable version of this song, click here.