ऋतुराज आज मनि आला, ऋतुराज आज वनि आला !
नव सुमनांचा, नव कलिकांचा बहर घेऊनी आला !
कुंज कुंज अलि-पुंज गुंजने बघ झंकारित झाला !
सुरस रागिणी नव प्रणयाची कोकिळ छेडत आला !
नवथर सुंदर शीतल निर्झर त्यात रंगुनी गेला !
 
 
गीत - विद्याधर गोखले
संगीत - पं. राम मराठे, प्रभाकर भालेकर
स्वर - मधुवंती दांडेकर
नाटक - मदनाची मंजिरी (१९६५)
For the printable version of this song, click here.