मजला कुठे न थारा, मजला नसे निवारा !
करिते क्षणा-क्षणाला, दुर्दैव घोर मारा !

निष्प्रेम जीविताची नौका बुडून गेली
संसार-सागरी या ना सापडे किनारा !

वीणेवरी मनाच्या आघात जाहलासे
मांगल्य-भावनेच्या गेल्या तुटून तारा !
 
 
गीत - विद्याधर गोखले
संगीत - पं. राम मराठे, प्रभाकर भालेकर
स्वर - रामदास कामत
नाटक - मदनाची मंजिरी (१९६५)
For the printable version of this song, click here.