जरि या पुसून
गेल्या सा-या
जुन्या खुणा
रे
हा चंद्र पाहताना
होते तुझी पुन्हा
रे
त्या बाव-या
कळीने ते स्वप्न
पाहिलेले
वेड्या क्षणास
एका सर्वस्व
वाहिलेले
छळतो अजून जीवा
तो लाजरा गुन्हा
रे
ते श्वास कापरे
अन् आभास सावल्यांचे
रे चांदणेच
झाले डोळ्यांत
बाहुल्यांचे
अन् सूर सूर
झाल्या त्या
सर्व भावना
रे
नाही विचार
केला, मी पाहिले
न मागे
आले तुझ्याकडे
मी तोडून सर्व
धागे
का घालिता उडी
ही घर आठवे
कुणा रे ?
मी घातली उडी
हा नच दोष रे
कुणाचा
चुरडे कळी मनाची
हा खेळ प्राक्तनाचा
स्वप्ने विरुन
येते हातात
वंचना रे
हरवून स्वप्न
गेले, अश्रूच
आज जागे
वेडी तुझी कळी
ही बघते वळून
मागे
का पापण्यांत
मिटते निःशब्द
वेदना रे ?
|