बंदिनी स्त्री
ही बंदिनी
हृदयी पान्हा
नयनी पाणी
जन्मोजन्मीची
कहाणी
रूप बहिणीचे
माया देई
वात्सल्य मूर्त
आई होई
माहेरा सोडून
येई
सासरी सर्वस्व
देई
कधी सीता कधी
होई कुंती
सावित्रीची
दिव्य शक्ति
शकुंतला तूच
होसी
मीरा ही प्रीत
दिवाणी
युगेयुगे भावनांचे
धागे
जपावया मन तुझे
जागे
बंधने ही रेशमाची
सांभाळी स्त्रीच
मानिनी
|