मानसी राजहंस पोहतो
दल दल उघडित नवनवलाने कमलवृंद पाहतो ।

नील जलावर धवल विहग तो,
जलवलयांसह खेळ खेळतो ।
श्रीरामांच्या वक्षस्थळि जणू,
मौक्तिकमणि डोलतो ॥

दिवास्वप्न की भास म्हणू हा,
वनवासाचा ध्यास जणू हा ।
मनी वसे ते नयनांपुढती,
सजिवपणे रेखितो ॥
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - वासुदेव भाटकर
स्वर - ज्योत्सना भोळे
नाटक - भूमिकन्या सीता (१९५८)
राग - पहाडी (नादवेध)
For the printable version of this song, click here.