जाऊ देवाचिया गावा ।
देव देईल विसावा ॥१॥

देवा सांगो सुख दुःख ।
देव निवारील भूक ॥२॥

घालू देवासीच भार ।
देव सुखाचा सागर ॥३॥

राहो जवळी देवापाशी
आता जडोनी पायांसी ॥४॥

तुका म्हणे आम्ही बाळे
या देवाची लडिवाळे ॥५॥
 
 
रचना - संत तुकाराम
संगीत - आण्णा जोशी
स्वर - उषा मंगेशकर
For the printable version of this song, click here.