सावज माझं गवसलं
सावज माझं गवसलं
॥
अरे अरे सावजा
विसरू नको
उगाच गमजा करू
नको
तीर सरासर माझा
सुटता
कुणीच नाही
ग बचावलं ॥
लखलख लखलख माझा
बाण
करील तुझी रे
दाणादाण्
मदन-धनूच्या
बाणालाही
जयानं चटकन्
हरवलं ॥
अशी तशी मी
नसे कुणी
मी वनराणी रूपखनी
रस राजांनी
नवीन यौवन
तनमन माझं सजवलं
॥
पार्वतीच्या
शंकरानं
गिरिजेच्या
गिरीशानं
दुर्गेच्या
ग दुर्गेशानं
माझ्यावरी कृपा
केली ॥
|