मोहुनिया तुजसंगे
नयन खेळले जुगार
ओठावरले हासे
फेकियले रे
फासे
खेळाचा होय
निकर हो जिवलग
जादुगार
सहज पडे तुजसि
दान
लागले पणास
प्राण
मी पणात मन
हरले, येइ रे
गळ्यात हार
सारिलेस मोहरे
सहज अडविलेस
चिरे
बंद जाहली घरे
खेळ संपणार
पार
पळभर जरि जुग
जुळले
कटिवरुनी वरि
सरले
एकुलती एक नरद
पोटघरी होय
ठार
पटावरुन लाजरे
पळे घरात मोहरे
बाजू बिनतोड
मला देई चतुर
हा खिलार
|