कसा ग गडे झाला
? कुणी ग बाई
केला ?
राधे, तुझा
सैल अंबाडा
!
पृथ्वीच्या
पेल्यात गाळिली,
रजनीच्या बागेतिल
द्राक्षे
भुलवुनि तुजला
वनात नेली,
रसरसलेली रात्र
रंगली
वाजविता बासरी,
कचपाशांचा नाग
उलगडी फडा !
पहिल्या चंचल
भेटीमधली, बाल्याची
कबुतरे पळाली
वेणी तिपेडी
कुरळी मृदुला,
सुटली घालित
गंध-सडा !
भ्रमर रंगी
हा श्याम सापडे,
नीलकमल कचपाशि
तव गडे
अरुणोदय होताच
उलगडे, पाकळी
पाकळी होइ मोकळी
या कोड्याचा
झाला उलगडा
!
|