दारीच्या देवळीत,
जळो पणति सारि
रात
प्रगटले न अजुन
कांत, अंधकार
अंतरात
रात्रंदिन वाट
बघत, घालुनी
पळी कडीत
येइ ना अजून
मूर्त, माघारी
मंदिरात
रांगोळी अंगणात,
अश्रुबिंदु
घालतात
गाल ओठ भिजुन
जात, ओघळत्या
काजळात
वृंदावनि सांजवात,
नि:श्वासे विझुन
जात
तुळशिच्या प्रदक्षिणांत,
चर्र होत काळजात
नाथांची झालि
साथ, फक्त सात
पावलात
आज ऊर-तारु
फुटत, विरहाच्या
वादळात
कुंकवाच्या
कोयरीत, रोज
थबकतोहि हात
वैरी जे जे
न चिंति, ते
ते ये मनात
दारीच्या देवळीत,
उजळवली कुणि
ग वात ?
इश्श ते, तेच
कांत, प्रगटले
प्रकाशात
दास्यमुक्ति-संगरात,
विजयी झालेहि
कांत
मजसि मात्र
अडवितात, प्रीतीच्या
शृंखलात
|