त्यांच्याच
पावलांचा, हा
नाद ओळखीचा
ग !
कमले सरात फुलली,
कुसुमे वनात
खुलली
करण्यास मान
त्यांचा, हा
नाद ओळखीचा
ग !
येता सखा हसू
का ?, क्षण
काहि वा रुसू
का ?
रुसवा हसावयाचा,
हा नाद ओळखीचा
ग !
लटके रुसून
काही, क्षण
बोलणार नाही
हा मान मानिनीचा,
हा नाद ओळखीचा
ग !
कवटाळिता तनूला,
कुरवाळिता हनूला
रुसवा टिके
कशाचा ?, हा
नाद ओळखीचा
ग !
विसरून जीवभावा,
देईन आत्मदेवा
तांबुल चुंबनाचा,
हा नाद ओळखीचा
ग !
|