झुंजुमुंजु झालं, चकाकलं सम्दं रान
पगुन्‌ श्यान्‌ सोन्यावानी हरपतंया भान
 
घरट्यात चिवचिव करीती पाखरं
गव्हानीत चुळूबूळू करीती वासरं
 
आळुखपिळुख आता कशाचं ग रानी
उपसाया होवं आधी मोटंचं पानी
 
सुनं खळं बैलाविना चा-याविना बैल
जशी ऱ्हाती रयाविना घरात बाईल
 
शिळंपाकं काहीतरी आन रातचं ग
न्याहारिला बिगीबिगी बसू संगसंग
 
नग झाकु पदरात कन्साचं दानं
नग दावु लई भाव घेईन हातानं
 
पिरतीचं पीक लई येई माळावर
राबुनशान खाऊ संगं सकाळ दुपार
 
चढू डोंगरांची माथी तुडवू ओहोळ
हतामंदी घालून हात फिरू रानोमाळ
 
 
गीत - बाबुराव गोखले
संगीत - गजानन वाटवे
स्वर - गजानन वाटवे
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.