प्रेम कोणीही
करीना, का अशी
फिर्याद खोटी
?
प्रेम दे अन्यास
आधी, ठेविशी
का स्वार्थ
पोटी ?
आपल्या या चारुतेशी
विस्मरूनी जा
सुकेशी,
भाळता कोणास
देशी का न भक्तीची
सचोटी ?
प्रेम का संगीन
गुच्छी, प्रेम
का रंगीन ओठी
प्रेम लाभे
प्रेमळाला,
त्याग ही त्याची
कसोटी.
|