एकटीच भटकत
नदिकाठी
ऐन दुपारी तोऱ्यानं
नटुन थटुन अशि
चटकचांदणी
कुठं ग चाललीस
नखऱ्यानं
अंगात धमक डोळ्यात
चमक
कमरेत लचक नजरेत
वचक
काळजास का देसी
चरका
मारूनि मुरका
कुर्ऱ्यानं
जशि कुणा घायाळ
कराया
नयनशरांच्या
माऱ्यानं
गाल रंगदार
चाल ढंगदार
धुंद नागिणी
जशी चमकशी
नवरसरंग-फवाऱ्यानं
चाल जरा हळू,
सावर, आवर
पदर उडाला वाऱ्यानं
|