जादुगारिणी
सखे साजणी
थांब जराशी
ग
प्रेमभाव नजरेत
दाविले
तूच आधी मज
नादि लाविले
गोड हसुनिया
हृदयि फुलविल्या
गुलाब-राशी
ग
तुझ्या संगती
गिरिकंदरही
राजमंदिराहुनि
सुखदायी
तू माझी तर
तुच्छ अवांतर
सौख्य-मिराशी
ग
दोन जिवांचे
जातक जुळले
भाग्यलेख प्रीतिने
उजळले
जगास मानू उगा
जुमानू
का ग्रहराशी
ग
स्फूर्ति-तारका
तू झगमगती
करू जोडिने
प्रवास जगती
सदा बिलगली
हीच एकली
आस उराशी ग
|