या धुंद चांदण्यात
तू संगती हवास
होईल रे सुखाचा
तुज संगती प्रवास
नौकेमध्ये बसावे,
मृदु चांदणे
हसावे,
मी भावगीत गावे,
तू त्यात मोहरावे
’मी’ ’तू’ पणा
विरावा, जावे
सरून भास
होईल रे सुखाचा
तुज संगती प्रवास
व्हावास चंद्रमा
तू, मी रोहिणी
बनावे
त्या चंद्र-रोहिणीला
चिडवूनिया हसावे
व्हावा अपूर्व
अपुल्या मधुप्रीतिचा
विलास
होईल रे सुखाचा
तुज संगती प्रवास
वायू असा खट्याळ,
सांगे जगास
गूज
या चांदण्या
तशाच, हसती
त्यजून लाज
मी लाजरी लता
रे, आधार तू
जिवास
होईल रे सुखाचा
तुज संगती प्रवास
|