सांग मला रे
सांग मला
आई आणखी बाबा
यातुन, कोण
आवडे अधिक तुला
?
आई दिसते गोजिरवाणी,
आई गाते सुंदर
गाणी
तऱ्हेतऱ्हेचे
खाऊ येती, बनवायाला
सहज तिला !
आई आवडे अधिक
मला !
गोजिरवाणी दिसते
आई, परंतु भित्री
भागुबाई
शक्तिवान किती
असती बाबा थप्पड
देती गुरख्याला
!
आवडती रे वडिल
मला !
घरात करते खाऊ
आई, घरातल्याला
गंमत नाही
चिंगम अन्
चॉकलेट तर,
बाबा घेती रस्त्याला
!
आवडती रे वडिल
मला !
कुशीत घेता
रात्री आई थंडी,
वारा लागत नाही
मऊ सायीचे हात
आईचे सुगंध
तिचिया पाप्याला
!
आई आवडे अधिक
मला !
निजता संगे
बाबांजवळी भुते-राक्षसे
पळती सगळी
मिशा चिमुकल्या
करती गुदगुल्या
त्यांच्या अपुल्या
गालाला !
आवडती रे वडिल
मला !
आई सुंदर कपडे
शिवते, पावडर,
तिटी तीच लावते
तीच सजविते
सदा मुलींना
रिबीन बांधुन
वेणीला !
आई आवडे अधिक
मला !
त्या रिबिनीला
पैसे पडती ते
तर बाबा मिळवुनि
आणती
कुणी न देती
पैसा-दिडकी
घरात बसल्या
आईला !
आवडती रे वडिल
मला !
बाई म्हणती
माय पुजावी,
माणुस ती ना
असते देवी
रोज सकाळी नमन
करावे हात लावूनी
पायाला !
आई आवडे अधिक
मला !
बाबांचा क्रम
वरती राही,
त्यांच्या पाया
पडते आई !
बाबा येता भिऊनी
जाई सावरते
ती पदराला !
आवडती रे वडिल
मला !
धडा शीक रे
तू बैलोबा,
आईहुनही मोठ्ठे
बाबा
म्हणून आया
तयार होती,
बाबांसंगे लग्नाला
!
आवडती रे वडिल
मला !
|