कान्हू घेउन जाय, रानी धेनू घेउन जाय
संगे चाले श्रीराम सुदाम
मागे बोले माय ! मागे बोले माय !
कान्हू घेउन जाय, रानी धेनू घेउन जाय

म्हणे माझ्या लेकरा रे माझ्या वासरा रे
उशीर नको लावू वेगे परत घरी ये रे
हाती राहे खीर लोणी कोण दुजे खाय ?
संगे चाले श्रीराम सुदाम
मागे बोले माय ! मागे बोले माय !
कान्हू घेउन जाय, रानी धेनू घेउन जाय

डोळ्यांतली बाहुली तू राजा सोन्या रे
ओंजळीत आला जणू चैत चांदवा रे
सूर्य येता माथी तुझे पोळतील पाय !
संगे चाले श्रीराम सुदाम
मागे बोले माय ! मागे बोले माय !
कान्हू घेउन जाय, रानी धेनू घेउन जाय
 
 
गीत - शांता शेळके
संगीत -
स्वर - उषा मंगेशकर
For the printable version of this song, click here.