आठवणी दाटतात
! धुके जसे
पसरावे
जे घडले ते
सगळे सांग कसे
विसरावे
विसरावे नाव-गाव,
विसरावे हावभाव
मूक भाव नजरेतिल
हृदयाला उमजावे
!
आठवणी दाटतात
!
रात्र अशी अंधारी,
उरलेली संसारी
सोबतीस पहाटेस
विरहाचे स्वप्न
हवे !
आठवणी दाटतात
!
स्वप्नातिल
जादु अशी, मज
गमते अविनाशी
प्रेम तुझे
सत्य गमे, त्यास
कसे विसरावे
?
आठवणी दाटतात
!
|