ना ना ना ना
नाही नाही नाही
ग !
आता पुन्हा
मजसि येणे नाही
ग !
घन भरुन भरुन
झरे गगन वरुन
कुणि साजण दुरुन
मज दिसे कि
हसे
खुणवि सये बाइ
ग !
ना ना ना ना
नाही नाही नाही
ग !
बोलति चुडे
किण किण किण,
कलशि जल गाते
ग !
नूपुर बोले
छुन छुन छुन,
पाउल पुढे जाते
ग !
नवल घडे अहा
अहा अहा
हृदय धडधडे
कि उडे पदर
सये बाइ ग !
ना ना ना ना
नाही नाही नाही
ग !
गहन वन झाले
ग शीतल वारा
भिजलि तनु सारी
ग झेलून धारा
पवन वाजे सण
सण सण, वेढुन
मज घेतो ग
भ्रमर बोले
गुण गुण गुण,
साजण साद देतो
ग !
नयन झरे अहा
अहा अहा
अधर थरथरे कि
झुरे आतुर मन
बाइ ग !
ना ना ना ना
नाही नाही नाही
ग !
नाही सुचत काम
नाही रुचत धाम
मनमोहन श्याम
मज दिसे कि
हसे
सजण ठायि ठायि
ग !
ना ना ना ना
नाही नाही नाही
ग !
|