घनश्याम नयनी आला
सखे, मी काजळ घालू कशाला ?

रोमांचांनी नटली काया
हिरे-माणके कशास वाया ?
कशास मोहनमाला ?

कटीभोवती कर कृष्णाचे
लेणे ल्याले आभासाचे
कशास मग मेखला ?

कृष्णसख्याची मादक मुरली
रात्रंदिन या कानी भरली
शृंगार सर्व झाला !
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - सरस्वती राणे
For the printable version of this song, click here.