नका मारु खडा,
शिरी भरला घडा,
सख्या जाइल
तडा,
हे भिजेल गोरे
अंग !
ऐके न बाइ तरी
हसे खदाखदा,
असा कसा श्रीरंग
?
नको धरू हात
रे, पिचेल माझा
चुडा
सुटेल बाइ जुडा,
अवखळा, भिजतिल
काजळकडा
ऐके न बाइ तरि,
करि नयन वाकडा
!
थंडीत भरे हुडहुडी,
थरकापे माझी
कुडी
ती खरी सुखाची
घडी
घे बळेच ओढुनि
कवळि रेशमी
शेला
अधरिचा मधुर
मधु मेवा, मुरलीस
वाटला हवा
हे असे काय
हो देवा ?
फुटु द्या आता
घडा, खुशाल
मारा खडा
यापुढे कधि
न मी करीन हो
आरडा
|