जीव तुला लोभला
माझ्यावरी रे
शोभना
या ऋणाची विस्मृती
ती ना कधी होवो
मना !
का मुळी कोणी
करावे प्रेम
एखाद्यावरी
?
हे तुझे सौजन्य,
पाणी आणिते
या लोचना !
शक्तिच्या राज्यांत
सक्ती शोभते,
शोभो तिथे !
प्रीतिला स्वातंत्र्य
आधी पाहिजे,
का होय ना ?
आपुल्यामध्ये
पडू दे शैलराजी
सह्य ही
भेटती दूरांतरे
सप्रेम कृष्णा-कोयना
!
चाललो एका दिशेने
थोडके का हे
असे ?
सागरी एकाच
भेटू अंतकाली
मोहना !
|