रे तुझ्यावाचून
काही येथले
अडणार नाही
।
रे तुझ्यावाचून
दुनिया दीन
ही होणार नाही
॥
गर्व तव हा
व्यर्थ, मी
केले असे, केले
तसे
चोच देई पाखरांना,
तोच चारा देतसे
एकही घरटे तुझ्याविण
मोडुनि पडणार
नाही !
तानसेनावाचुनि,
किंवा सदारंगाविण
काय मैफिल या
जगाची रंगली
केंव्हाच ना
?
कोण तू ? तुजवीण
वीणा, बंदही
होणार नाही
!
|