बोल कन्हैय्या, का रुसला, राधेवरी ?
तू अनुरागा भारी चंचल
जैसे वाहे यमुनेचे जल
धरिसी का रे, लटक्या रागा ?
तुझ्यामुळे बदनामी झाली
नेत्र-पापण्या झुकल्या खाली
सोडी ना रे, अपुला त्रागा ?
गीत
-
उमाकांत काणेकर
संगीत
-
श्रीकांत ठाकरे
स्वर
-
शोभा गुर्टू
राग
-
पहाडी, मिश्र
मांड,
ठुमरी (नादवेध)