सांगू कशी, प्रिया, मी माझे मला कळेना
हळुवार भावना ही शब्दास आकळेना

एकांत आगळा हा, ही वेगळीच रात
चाहूल काय बाई बाहेर की मनात
संकोच लाजरीचा अजूनी कसा ढळेना

लज्जा अबोल झाली, डोळेच बोलु दे. रे
अपुरा अधीर श्वास हृदयास तोलु दे, रे
उकलून पाकळी ये परि, फूल हे फुलेना

नवखा तुझ्यापरी मी नवखी मनात धुंदी
माझ्यातुझ्यासभोती भरले धुके सुगंधी
मधुरात मीलनाची फिरुनी अशी मिळेना
 
 
गीत - शांता शेळके
संगीत - प्रभाकर जोग
स्वर - अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर
चित्रपट - सतीची पुण्याई (१९८०)
For the printable version of this song, click here.