कुहु कुहु कुहु येइ साद
उधळित वनि स्वरतुषार
मधुर हे तराणे, ऋतुराज आज आला !

सुमनांचे रंग रंग ऋतु-रंगित झाले
गंधगीत रतिचंचल अवनीवर दरवळले
वारा भिरभिर हा तोडी बंध

विहगांचे अंतरंग मदमंथर झाले
स्वप्नशिल्प कलिकांच्या अधरावर थरथरले
सारे स्थिरचर बघ होई धुंद
 
 
गीत - वंदना विटणकर
संगीत - अनिल, अरुण
स्वर - अनुराधा पौडवाल
राग - मियॉं मल्हार
For the printable version of this song, click here.